डॉ.नामदेव भोसले एक प्रेरणास्थान
*डॉ नामदेव भोसले एक प्रेरणास्थान.* माणसाच्या वयाची पन्नाशी ओलांडली की सर्व जण भविष्यकाळाचा विचार करतात त्यात मुले बाळे, त्यांची लग्ने, नोकरी, आपल्या भविष्यासाठी गुंतवणूक वगैरे वगैरे, परंतु पन्नाशीत चालता चालता धावायला शिकायचं हे कोणी स्वप्नातही पाहत नसेल व कोणी स्वप्न पाहिले आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले तर त्याला वेडा म्हणतील अशीच भावना प्रत्येकाच्या मनात असते. पण मी त्याला अपवाद आहे त्याचे कारण डॉ नामदेव भोसले. पानी फौंडेशन निमित्त डॉ नामदेव भोसले यांच्याशी प्रत्यक्ष भेटी होत गेल्या व बघता बघता त्यांच्यातील बऱ्याच चांगल्या गुणांचा प्रत्यय येत गेला. प्रत्येक माणसाची स्वताची अशी एक वेगळी ओळख (आयडेंटिटी) असते. ती बदलणे खूप अवघड. माणूस आपल्या सवयी सहजासहजी सोडत नाही त्याला मीही अपवाद नव्हतो..दि ८ एप्रिल ते २२ मे २०१८ दरम्यान पानी फौंडेशन कार्यक्रमा निमित्ताने गावी जाणे येणे वाढले. अर्थातच सोबत डॉ नामदेव भोसले असायचे. पाणी फौंडेशन चा एक ब्रीद वाक्य होते. धावणाऱ्या पाण्याला थांबवायचं, थांबलेल्या पाण्याला अडवायचं व अडविलेल्या पाण्याला जिरवायचे।। आमच्या गावी डॉक...