Posts

Showing posts from May, 2023

माझा मॅरेथॉन प्रवास - राहुल जगदाळे

Image
'मॅरेथॉन' एक न संपणारा प्रवास माझा मॅरेथॉन प्रवास🏃 May 27, 2023 One Run Can Change Your Day, Many Run's Can Change Your Life प्रत्येकाला आयुष्यात कोणता ना कोणता छंद असतोच ज्याला तो मनापासून जोपासतो मला पण असंच सहज धावण्याच्या आवडीतून 2015 साली एका छंदाचा नाद लागला आणि सुरू झाली माझ्या आयुष्याची 🏃🏃🏃🏃🏃मॅरेथॉन..... मॅरेथॉन   हा शब्दच मुळात 2015 साली समजला आणि तिथूनच माझा मॅरेथॉन प्रवास सुरु झाला.  कोणत्याही ध्येयाकडे वाटचाल करताना वरती चढण्यासाठी आपण सुरवातीला ज्या पायरीचा सहारा घेतो त्या पायरीला विसरून चालत नाही कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर आपण पुढची पायरी चढुच शकलो नसतो.   हाच तो माझ्या पायात असलेला 250/- रुपयांचा रबरी बुट ज्याच्या जीवावर मी माझ्या आयुष्यातील पहिली फुल मॅरेथॉन पुर्ण केलेली. अजूनही मी त्याला जपून ठेवलं आहे कारण माझ्या मॅरेथॉन प्रवासाची हिच ती पहिली पायरी आहे आणि विशेष म्हणजे आज जरी या बुटाकडे पाहिले तरी  त्या मॅरेथॉन च्या सर्व आठवणी ताज्या होतात अजूनही स्वतःवर विश्वास बसत नाही की या बुटाने आपण फुल मॅरेथॉन पुर्ण केलेली. मी त्यावेळी अरुणाचल...