कोल्हापूर रत्न पुरस्कार
आपल्या सर्वांचे लाडके लाईफ इज ब्युटिफुल मज्जाच मज्जा समूहाचे एक आदरणीय व्यक्तिमत्त्व *श्री संजय मोरे साहेब* पनवेल यांना राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठान तर्फे या वर्षीचा *कोल्हापूर रत्न* या बहुमान पुरस्काराने गौरवण्यात आले. श्री मोरे साहेब एक उत्कृष्ठ क्रीडापटू, धावपटू, क्रीडा शिक्षक, रनिंग कोच व माजी NSW कमांडो आहेत. ते रोज सकाळी ४.३० ते ६.३० यावेळेत नियमित व्यायाम करणाऱ्या, धावणाऱ्या मुलांना, तरुणांना, लहान थोर मंडळींना शारीरिक फिटनेसचे प्रशिक्षण देत असतात. व संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत देशाच्या सीमेवर लढण्यासाठी इच्छुक असणाऱ्या, आर्मी नेव्ही एअर फोर्स मध्ये व पोलीस भरती साठी प्रयत्न करतं असणाऱ्या गरीब होतकरू विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतात. स्वतःची नोकरी सांभाळून समाजातील गरजू घटकांसाठी काम करणे, गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी स्वतःचा मौल्यवान वेळ व योगदान देणे हेच त्यांच्या आयुष्याचे एकमेव ध्येय आहे. त्यांनी आजवर १०० हून जास्त हाफ मॅरेथॉन पूर्ण करून एक खूप मोठा टप्पा पूर्ण केला आहे. स्वतःचे, आपल्या कुटुंबाचे, त्यांच्या संपर्कात येणाऱ्या मिञ मैत्रिणींचे व आजू बाजूच्या प्रत्येकाचे आ...