कोल्हापूर रत्न पुरस्कार
आपल्या सर्वांचे लाडके लाईफ इज ब्युटिफुल मज्जाच मज्जा समूहाचे एक आदरणीय व्यक्तिमत्त्व *श्री संजय मोरे साहेब* पनवेल यांना राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठान तर्फे या वर्षीचा *कोल्हापूर रत्न* या बहुमान पुरस्काराने गौरवण्यात आले.
श्री मोरे साहेब एक उत्कृष्ठ क्रीडापटू, धावपटू, क्रीडा शिक्षक, रनिंग कोच व माजी NSW कमांडो आहेत. ते रोज सकाळी ४.३० ते ६.३० यावेळेत नियमित व्यायाम करणाऱ्या, धावणाऱ्या मुलांना, तरुणांना, लहान थोर मंडळींना शारीरिक फिटनेसचे प्रशिक्षण देत असतात. व संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत देशाच्या सीमेवर लढण्यासाठी इच्छुक असणाऱ्या, आर्मी नेव्ही एअर फोर्स मध्ये व पोलीस भरती साठी प्रयत्न करतं असणाऱ्या गरीब होतकरू विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतात. स्वतःची नोकरी सांभाळून समाजातील गरजू घटकांसाठी काम करणे, गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी स्वतःचा मौल्यवान वेळ व योगदान देणे हेच त्यांच्या आयुष्याचे एकमेव ध्येय आहे.
त्यांनी आजवर १०० हून जास्त हाफ मॅरेथॉन पूर्ण करून एक खूप मोठा टप्पा पूर्ण केला आहे. स्वतःचे, आपल्या कुटुंबाचे, त्यांच्या संपर्कात येणाऱ्या मिञ मैत्रिणींचे व आजू बाजूच्या प्रत्येकाचे आयुष्य त्यांनी आरोग्यदायी व फिटनेस ने परिपूर्ण केले आहे. या बरोबरच ते स्वतः एक उत्कृष्ट कवी सुध्दा आहेत. त्यांची आपले प्रेरणास्थान डॉ. नामदेव भोसले यांच्यावरील कविता ऐकली की त्याची प्रचिती येते.
ते एक निसर्गप्रेमी व पर्यावरण प्रेमी व्यक्ती असून हरित वसुंधरेच्या रक्षणासाठी, त्यांनी आजवर शेकडो झाडे लावून या विश्वात सुंदरता निर्माण करण्यासाठी आपले खारीचा वाटा उचलून मोलाचे योगदान दिले आहे.
अशा थोर वैविध्यपूर्ण कलात्मक, आयुष्य जगणाऱ्या आपल्या मित्राला कोल्हापूर रत्न चा बहुमान मिळवून देणारा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे ओपन युनिव्हर्सिटी ऑफ सेल्फ एक्स्प्रेशन व मनमुक्त फाऊंडेशन च्या वतीने हार्दिक अभिनंदन व त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
💐💐🌱🌱🌹🌹❤️❤️🏃♂️🏃♂️🚴♂️🚴♂️
पुरस्कार सुंदर आहे
मज्जाच मज्जा🌹🌹
आयुष्य सुंदर आहे
मज्जाच मज्जा🌹🌹
लाईफ इज ब्युटिफुल
मज्जाच मज्जा🌹🌹
Comments
Post a Comment