श्रवण आणि संवाद
LIFE IS BEAUTIFUL 🌹🌹 MAJJACH MAJJA🏃🏻♂🏃🏻♀🚴 शनिवार दि. 20 जून 2020 ZOOM सेशन 3 *श्रवण आणि संवाद* डॉ नामदेव भोसले यांच्या स्वभावाने व कर्तृत्वाने प्रेरित होऊन आयुष्यात काहीतरी वेगळे करण्याची धमक असलेल्या तरुणाईची ही तिसरी सार्वजनिक ऑनलाइन बैठक. श्रवण आंणि संवाद या विषयावार सर्वांचे मत जाणून घेणे व त्यावर ऊपाय शोधून कसे निर्धास्तपणे व सामान्यपणे मार्गक्रमण करता येईल एवढा माफक उद्देश डोळ्यासमोर ठेऊन या बैठकीचे आयोजन होते. श्री संजय इंगळे हे मंत्रालयातील एक ऊच्चपदस्थ अधिकारी याविषयीचा अभ्यास असलेले व landmark फोरम च्या माध्यमातून सर्वाना अभिप्रेत असणारे श्रवण आंणि संवाद याविषयी बोलणार होते व हाच मुख्य एजंडा होता. श्री संजय इंगळे साहेबानी खूप चांगल्या शब्दात व विस्तृत पणे आपले श्रवण व संवाद या विषयीचे मनोगत व विचार व्यक्त केले. आपल्या दररोजच्या जीवनात दुसर्याचे ऐकणे वा ऐकून घेणे व त्यावर प्रतिक्रिया देणे व याविषयीची आपली सकारात्मक मनोवृती किती जबाबदार आहे. हे उदाहरणा दाखल पटवून दिले. त्यातील काही मुद्दे खालीलप्रमाणे. 1) सर्वांशी संवाद साधण्यासाठी व स्वताला व्यक...