श्रवण आणि संवाद
LIFE IS BEAUTIFUL 🌹🌹
MAJJACH MAJJA🏃🏻♂🏃🏻♀🚴
शनिवार दि. 20 जून 2020
ZOOM सेशन 3
*श्रवण आणि संवाद*
डॉ नामदेव भोसले यांच्या स्वभावाने व कर्तृत्वाने प्रेरित होऊन आयुष्यात काहीतरी वेगळे करण्याची धमक असलेल्या तरुणाईची ही तिसरी सार्वजनिक ऑनलाइन बैठक.
श्रवण आंणि संवाद या विषयावार सर्वांचे मत जाणून घेणे व त्यावर ऊपाय शोधून कसे निर्धास्तपणे व सामान्यपणे मार्गक्रमण करता येईल एवढा माफक उद्देश डोळ्यासमोर ठेऊन या बैठकीचे आयोजन होते.
श्री संजय इंगळे हे मंत्रालयातील एक ऊच्चपदस्थ अधिकारी याविषयीचा अभ्यास असलेले व landmark फोरम च्या माध्यमातून सर्वाना अभिप्रेत असणारे श्रवण आंणि संवाद याविषयी बोलणार होते व हाच मुख्य एजंडा होता.
श्री संजय इंगळे साहेबानी खूप चांगल्या शब्दात व विस्तृत पणे आपले श्रवण व संवाद या विषयीचे मनोगत व विचार व्यक्त केले. आपल्या दररोजच्या जीवनात दुसर्याचे ऐकणे वा ऐकून घेणे व त्यावर प्रतिक्रिया देणे व याविषयीची आपली सकारात्मक मनोवृती किती जबाबदार आहे. हे उदाहरणा दाखल पटवून दिले. त्यातील काही मुद्दे खालीलप्रमाणे.
1) सर्वांशी संवाद साधण्यासाठी व स्वताला व्यक्त होण्यासाठी यूनिवर्सिटी ऑफ़ सेल्फ एक्सप्रेशन व्हाव
2) संवादाचे अनेक पैलू आहेत ते कसे वापरावे उदा: बोलणे, ऐकणे.
दुसर्याचे न ऐकणे, शब्द कसे वापरावे इत्यादी.
3) Feedback mechanism म्हणजे काय Incomplete communication म्हणजे काय ते सांगितले व ऐकण्याची कला, ऐकण्यातले फ़िल्टर्स, आंतरीक आवाज, संवाद साधणे, त्यातले barriers या सर्वांचा उहापोह केला.
4) आपले इतरांचे ऐकणे कसे आहे हीच आपली personality असते. हे पटवून दिले.
5) संवाद व त्याचे sharing इतरांशी कसे असावे
6) स्वताच्या मर्यादा, स्वत ऐकणे, त्यातून होणारी कृती व त्यातून निर्माण होणारे जग खूप सुंदर असते.
7) Dancing in Communication.
8) आपला संवाद दुसर्याच्या पर्यंत पोहोचला म्हणजे आपला संवाद बरोबर आहे हे समजाव
9) स्वताला ऐकण्यात फोकस करावे .
10) आपला संवाद हा दुसर्याच्या आयुष्यात बदल घडविणारा असावा.जी निरंतर प्रक्रिया आहे.
11) लाइफ ईज ब्यूटीफुल मज्जाच मज्जा हे अनुभवल आणि उपभोगल पाहिजे.
12) 3 Laws of Performance चे 3 नियम सांगितले.
डॉ. नामदेव भोसले यानी मांडलेले काही परखड विचार.
1) आपण आपले स्वताबद्दल ऐकणे.
2) अंतर्मन हे भगवान आहे.
3) जे आपल्याला दुसर्याबद्दल वाटते ते दुसर्या बद्दल नस्तेच ते आपलेच विश्व व confidance असतो.
4) जशी दृष्टी तशी सृष्टी
5) हे विश्व सुंदर आहे ..
6) सर्व काही शक्य आहे.
7) क्रिया तिथे प्रतिक्रिया असतेच.
8) स्वताशी प्रामाणिक रहावे.
9) साधेपणा व सहजपणा आचरणात आणावे.
10) स्वताला स्वयंशिस्त बनवावे.
11) सर्वांगीण आरोग्य तयार करावे.
12) स्वताची विश्वासाहर्ता जोपासावी
13) सेवाभावी वृती रुजवावी.
14) माणुसकीची जाणीव असावी.
डॉ. राखी मनियार यानी नेहमीप्रमाणे या कार्यक्रमाचे खूप सुंदर सूत्र संचालन केले व कार्यक्रमात जाण आणली.
श्री.अशोक पटाडे व श्री. दादा सुर्यवंशी यानी एक पाऊल पुढे टाकून या कार्यक्रमास प्रोफ़ेशनल टच देण्याचे प्रयत्न करुन सर्व तांत्रिक बाबींचे सुरेख नियोजन केले.
ईतर मान्यवर व त्यांचे श्रवण व संवाद याविषयीचे विचार, प्रश्न व मनोगत......
अस्मिता (216 सुर्य नमस्कार कसे पूर्ण केले व स्वताचे ऐकणे याविषयी आपले अनुभव शेयर केले)
डॉ प्रशांत भामरे (covid चा स्व अनुभव सांगितला, स्वता बद्दल लावलेला फ़िल्टर)
मयुरी मोरे (कोरोनाची भिती)
तानाजी काटकर (रनिंगचा अनुभव)
रोहन पाटील (गावाकडील आठवणी, पॉजिटिव अप्प्रोच, नविन सिनेमा विषयी आपली माहिती दिली)
राजेंद्र कुराडे ( फिजिकल ऐक्टिविटी शिवाय काही ऐक्टिविटी व्हाव्यात, एक्स्ट्रा आर्डिनरी कामाची अपेक्षा, अमेज़िंग काही तरी करावे, ग्रुपचे contest क्लियर करावेत अशा सुचना)
महेश राणे (विश्वासार्हता व Reliability वाढवावी, listening is an access)
अरविंद काटकर (Perception , action, reaction, आपले ऐकणे हे ठरलेले असते)
मृणाल सावंत (दोघा मधील भांडण व कम्यूनिकेशन gap, context)
सुप्रिया (समोरच्या व्यक्तीचे ऐकणे कसे थांबवायचे व स्वता कसे व्यक्त व्हायचे)
राहूल जगदाळे (काही ठराविक वेळेत इतरांचे कॉल येणे यात आपली ही जबाबदारी व योग्यता वाटते म्हणून त्यास सकारात्मक घेणे)
रुपेश कदम (ऐकण्या विषयीचा अनुभव सांगितला व कसे ऐकले पाहिजे ते विस्तृत केले. कोरोनामुळे डोळ्याची भाषा शिकली पाहिजे)
अमोल शेवाळे (Filtration, नकारात्मक फ़िल्टर बाहेर काढणे.संवाद साधणारा सकारात्मक असेल तर काम नक्की होते.)
अशोक पठाडे (Conviction व खात्री कुठून येते)
विद्या काटकर (जशी दृष्टी तशी सृष्टी व संवाद करण्याची पद्धत)
या Life is beautiful majjach majja ZOOM3 बैठकीस जवळ जवळ 70 जण हजर होते. रोज सकाळी लवकर उठण्याच्या व आपली दिवसाची सुरुवात नयनरम्य पहाटे पासून करण्याच्या सर्वांच्या आश्वासनानंतर या बैठकीची सांगता झाली. येणारा प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी नविन संधी घेऊन येणारा ठरेल व आपल आयुष्य कस सुंदर करता येईल याचेच ध्येय डोळ्यासमोर ठेऊन Life is beautiful majjach majja ZOOM4 साठी शनिवार दि. 27जून रोजी पुन्हा एकदा एक नविन विषय घेऊन ही मज्जाच मज्जा भेट ठरली.
हे आयुष्य सुंदर आहे ..🌹🌹
मज्जाच मज्जा 🏃🏻♂🏃🏻♀🚴
एन्जॉय दिल से ❤❤
Comments
Post a Comment