Posts

माझा मॅरेथॉन प्रवास - राहुल जगदाळे

Image
'मॅरेथॉन' एक न संपणारा प्रवास माझा मॅरेथॉन प्रवास🏃 May 27, 2023 One Run Can Change Your Day, Many Run's Can Change Your Life प्रत्येकाला आयुष्यात कोणता ना कोणता छंद असतोच ज्याला तो मनापासून जोपासतो मला पण असंच सहज धावण्याच्या आवडीतून 2015 साली एका छंदाचा नाद लागला आणि सुरू झाली माझ्या आयुष्याची 🏃🏃🏃🏃🏃मॅरेथॉन..... मॅरेथॉन   हा शब्दच मुळात 2015 साली समजला आणि तिथूनच माझा मॅरेथॉन प्रवास सुरु झाला.  कोणत्याही ध्येयाकडे वाटचाल करताना वरती चढण्यासाठी आपण सुरवातीला ज्या पायरीचा सहारा घेतो त्या पायरीला विसरून चालत नाही कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर आपण पुढची पायरी चढुच शकलो नसतो.   हाच तो माझ्या पायात असलेला 250/- रुपयांचा रबरी बुट ज्याच्या जीवावर मी माझ्या आयुष्यातील पहिली फुल मॅरेथॉन पुर्ण केलेली. अजूनही मी त्याला जपून ठेवलं आहे कारण माझ्या मॅरेथॉन प्रवासाची हिच ती पहिली पायरी आहे आणि विशेष म्हणजे आज जरी या बुटाकडे पाहिले तरी  त्या मॅरेथॉन च्या सर्व आठवणी ताज्या होतात अजूनही स्वतःवर विश्वास बसत नाही की या बुटाने आपण फुल मॅरेथॉन पुर्ण केलेली. मी त्यावेळी अरुणाचल...

जीवन एक अलौकिक अनुभूती

जीवन एक अलौकिक अनुभुती जीवन एक अलौकिक अनुभुती*"जीवन एक अलौकिक अनुभुती* "    आज दिनांक *15/02/2022* रोजी औ. प्र. संस्था, अंबरनाथ येथे माननीय *सह संचालक ** *डॉ. नामदेव भोसले साहेब* यांनी दिलेल्या भेटीदरम्यान मानवी जीवनाबाबत प्रकर्षाने जाणवलेले काही *ठळक मुद्दे खालीलप्रमाणे* ..... **आजचा दिवस जीवनाला खऱ्या अर्थाने प्रेरणादायी व सकारात्मकतेने पाहण्याचा ठरला. स्वतःमधील कोणत्याही प्रकारचा 'न्यूनगंड' बाजुला सारुन,मीच निसर्गाची सर्वोत्तम कलाकृती आहे, असे मनावर सतत बिंबवणेआणिआयुष्यात येणार्‍या प्रत्येक संकटाला धीरोदात्तपणे सामोरे जाणे.     सुहास्य वदनाने आयुष्यातील दुःखांना, संकटांना तोंड द्यावे. सतत कृतीशील राहणे. जे काही जीवनात करु ते सर्वोत्कृष्ट करु. गरीबी, दुःख,संकटे यांचा बाउ न करता आपण ज्या व्यवसायात, क्षेत्रात आहोत तिथे अत्युत्तम प्रदर्शन करणे.     जशी आपली दृष्टी तशीच असणार सृष्टी, या उक्तीप्रमाणे आपला दृष्टीकोन सकारात्मक ठेवणे. फक्त वर्तमानात जगणे, भुतकाळ तसेच भविष्याचा विचार न करता.  स्नेह, संस्कार, स्पर्श, सहवास आणि स्वातंत्र्य या पंचसुत्र...

कोल्हापूर रत्न पुरस्कार

आपल्या सर्वांचे लाडके लाईफ इज ब्युटिफुल मज्जाच मज्जा समूहाचे एक आदरणीय व्यक्तिमत्त्व *श्री संजय मोरे साहेब* पनवेल यांना राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठान तर्फे या वर्षीचा *कोल्हापूर रत्न* या बहुमान पुरस्काराने गौरवण्यात आले. श्री मोरे साहेब एक उत्कृष्ठ क्रीडापटू, धावपटू, क्रीडा शिक्षक, रनिंग कोच व माजी NSW कमांडो आहेत. ते रोज सकाळी ४.३० ते ६.३० यावेळेत नियमित व्यायाम करणाऱ्या, धावणाऱ्या मुलांना, तरुणांना, लहान थोर मंडळींना शारीरिक फिटनेसचे प्रशिक्षण देत असतात.  व संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत देशाच्या सीमेवर लढण्यासाठी इच्छुक असणाऱ्या, आर्मी नेव्ही एअर फोर्स मध्ये व पोलीस भरती साठी प्रयत्न करतं असणाऱ्या गरीब होतकरू विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतात. स्वतःची नोकरी सांभाळून समाजातील गरजू घटकांसाठी काम करणे, गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी स्वतःचा मौल्यवान वेळ व योगदान देणे हेच त्यांच्या आयुष्याचे एकमेव ध्येय आहे. त्यांनी आजवर १०० हून जास्त हाफ मॅरेथॉन पूर्ण करून एक खूप मोठा टप्पा पूर्ण केला आहे. स्वतःचे, आपल्या कुटुंबाचे, त्यांच्या संपर्कात येणाऱ्या मिञ मैत्रिणींचे व आजू बाजूच्या प्रत्येकाचे आ...

श्रवण आणि संवाद

 LIFE IS BEAUTIFUL 🌹🌹 MAJJACH MAJJA🏃🏻‍♂🏃🏻‍♀🚴 शनिवार दि. 20 जून 2020 ZOOM सेशन 3 *श्रवण आणि संवाद* डॉ नामदेव भोसले यांच्या स्वभावाने व कर्तृत्वाने प्रेरित होऊन आयुष्यात काहीतरी वेगळे करण्याची धमक असलेल्या तरुणाईची ही तिसरी सार्वजनिक ऑनलाइन बैठक.  श्रवण आंणि संवाद या विषयावार सर्वांचे मत जाणून घेणे व त्यावर ऊपाय शोधून कसे निर्धास्तपणे व सामान्यपणे मार्गक्रमण करता येईल एवढा माफक उद्देश डोळ्यासमोर ठेऊन या बैठकीचे आयोजन होते.  श्री संजय इंगळे हे मंत्रालयातील एक ऊच्चपदस्थ अधिकारी याविषयीचा अभ्यास असलेले व landmark फोरम च्या माध्यमातून सर्वाना अभिप्रेत असणारे श्रवण आंणि संवाद  याविषयी बोलणार होते व हाच मुख्य एजंडा होता. श्री संजय इंगळे साहेबानी खूप चांगल्या शब्दात व विस्तृत पणे आपले श्रवण व संवाद या विषयीचे मनोगत व विचार व्यक्त केले. आपल्या दररोजच्या जीवनात दुसर्याचे ऐकणे वा ऐकून घेणे व त्यावर प्रतिक्रिया देणे व याविषयीची आपली सकारात्मक मनोवृती किती जबाबदार आहे. हे उदाहरणा दाखल पटवून दिले. त्यातील काही मुद्दे खालीलप्रमाणे. 1) सर्वांशी संवाद साधण्यासाठी व स्वताला व्यक...

डॉ.नामदेव भोसले एक प्रेरणास्थान

*डॉ नामदेव भोसले एक प्रेरणास्थान.* माणसाच्या वयाची पन्नाशी ओलांडली  की सर्व जण भविष्यकाळाचा विचार करतात त्यात मुले बाळे, त्यांची लग्ने, नोकरी, आपल्या भविष्यासाठी गुंतवणूक वगैरे वगैरे, परंतु पन्नाशीत चालता चालता धावायला शिकायचं हे कोणी स्वप्नातही पाहत नसेल व कोणी स्वप्न पाहिले आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले तर त्याला वेडा म्हणतील अशीच भावना प्रत्येकाच्या मनात असते. पण मी त्याला अपवाद आहे त्याचे कारण डॉ नामदेव भोसले.  पानी फौंडेशन निमित्त डॉ नामदेव भोसले यांच्याशी प्रत्यक्ष भेटी होत गेल्या व बघता बघता त्यांच्यातील बऱ्याच चांगल्या गुणांचा प्रत्यय येत गेला. प्रत्येक माणसाची स्वताची अशी एक वेगळी ओळख (आयडेंटिटी) असते. ती बदलणे खूप अवघड. माणूस आपल्या सवयी सहजासहजी सोडत नाही त्याला मीही अपवाद नव्हतो..दि ८ एप्रिल ते २२ मे २०१८ दरम्यान पानी फौंडेशन कार्यक्रमा निमित्ताने गावी जाणे येणे वाढले. अर्थातच सोबत डॉ नामदेव भोसले असायचे. पाणी फौंडेशन चा एक ब्रीद वाक्य होते.  धावणाऱ्या पाण्याला थांबवायचं, थांबलेल्या पाण्याला अडवायचं व अडविलेल्या पाण्याला जिरवायचे।। आमच्या गावी डॉक...

वेळ द्या स्वताला

हे आयुष्य खूप सुंदर आहे ..  खरंतर हा जगासाठीच एक ब्रेक गरजेचा होता. थांबा जरा 15 -20 दिवस घरी, काही बिघडत नाही. कुठे धावतोय आपण? का धावतोय आपण? नक्की काय मिळवायचय आपल्याला? याचा जरा विचार करा. आई वडिलांना वेळ द्या. आपल्या मुलांना वेळ द्या. आप्तेष्ट नातेवाईकांना वेळ द्या. हीच आपली खरी संपत्ती आहे. निर्जीव संपत्ती कमावण्याच्या नादात, आपण आपली सजीव संपत्ती हरवत चाललो आहोत. आपण काय खातोय? कसं वागतोय? कसं राहतोय? निसर्गाने आपल्याला एवढे दिले, पण आपण त्याला काय देतोय? हे सगळंच विचार करण्याची वेळ आली आहे. आरोग्य म्हणजे नक्की काय? आपली नक्की स्पर्धा कोणाची? या नाशवंत देहाची किती ती काळजी? भूतदया, करुणा काही आहे की नाही? का स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी इतरांचे अस्तित्व मान्यच करायचे नाही का? खरंच थांबा जरा थोडा वेळ. अजूनही वेळ गेली नाही. जरा विचार करा. नक्की आपले किती आयुष्य शिल्लक आहे याचा. आणि त्यात आपल्याला नक्की काय मिळवायचे आहे याचा. उत्पत्ती, स्थिती आणि लय हा तर सृष्टीचा नियम आहे. अशा हजारो वेळा ही युगे बदलली आहेत. युगे 28 तर तो विठोबाच विटेवरी उभा आहे. आता तुम्हीही झोपेतून उठा,...

नामदेव सर राहूलच्या चष्म्यातून.

*आयुष्य खरंच खुप सुंदर आहे मज्जाच मज्जा*☺️ *नामदेव सर आणि मी* आतापर्यंत zoom च्या माध्यमातून आपलं दोन सेशन झाले आणि दोन्ही सेशन मध्ये मला बोलायला माझं मत मांडायला पूर्ण संधी मिळाली पण माझ्यापेक्षा खूप सिनियर लोक आहेत त्यामुळे काय बोलावं आपण बोललेलो सर्वांना पटेलच का कदाचित माझ्यात एक वक्ता म्हणून बोलायला किंवा प्रत्यक्ष बोलण्याची जी क्षमता असते ती कमी असावी किंवा आपण ज्याला *प्रेझेंस ऑफ माईंड* म्हणतो ते नसावं त्यामुळं मनात खूप काही असूनही ते बोलता येत नाही पण ते लेखणीतून मांडण्याचा छोटा प्रयत्न नामदेव सर प्रत्येक वेळी बोलताना एकच वाक्य बोलतात की माझ्याबद्दल बोलू नका स्वतःचं अनुभव सांगा तसं त्यांचं पण बरोबर आहे कारण त्यांचं एकच म्हणणं आहे फक्त एक नामदेव नाही तर त्यांच्यासारखे असे हजारो लाखो नामा तयार झालं पाहिजेत परंतु सांगायचं झालं तर त्यांच्या *जीवन सुंदर आहे मज्जाच मज्जा या महाविद्यालयात* प्रवेश घेतल्यापासून स्वतःहून कोणतीही गोष्ट करायचं म्हटलं तर त्याची सुरवात नामदेव सरांच्या *नामा* पासूनच होते.    माझी आणि सरांची पहिली प्रत्यक्ष ओळख आमच्या गावचे पत्रकार बंधू रुपेश कदम यांन...