डॉ.नामदेव भोसले एक प्रेरणास्थान
*डॉ नामदेव भोसले एक प्रेरणास्थान.* माणसाच्या वयाची पन्नाशी ओलांडली की सर्व जण भविष्यकाळाचा विचार करतात त्यात मुले बाळे, त्यांची लग्ने, नोकरी, आपल्या भविष्यासाठी गुंतवणूक वगैरे वगैरे, परंतु पन्नाशीत चालता चालता धावायला शिकायचं हे कोणी स्वप्नातही पाहत नसेल व कोणी स्वप्न पाहिले आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले तर त्याला वेडा म्हणतील अशीच भावना प्रत्येकाच्या मनात असते. पण मी त्याला अपवाद आहे त्याचे कारण डॉ नामदेव भोसले. पानी फौंडेशन निमित्त डॉ नामदेव भोसले यांच्याशी प्रत्यक्ष भेटी होत गेल्या व बघता बघता त्यांच्यातील बऱ्याच चांगल्या गुणांचा प्रत्यय येत गेला. प्रत्येक माणसाची स्वताची अशी एक वेगळी ओळख (आयडेंटिटी) असते. ती बदलणे खूप अवघड. माणूस आपल्या सवयी सहजासहजी सोडत नाही त्याला मीही अपवाद नव्हतो..दि ८ एप्रिल ते २२ मे २०१८ दरम्यान पानी फौंडेशन कार्यक्रमा निमित्ताने गावी जाणे येणे वाढले. अर्थातच सोबत डॉ नामदेव भोसले असायचे. पाणी फौंडेशन चा एक ब्रीद वाक्य होते. धावणाऱ्या पाण्याला थांबवायचं, थांबलेल्या पाण्याला अडवायचं व अडविलेल्या पाण्याला जिरवायचे।। आमच्या गावी डॉक्टरांनी पुढाकार घेऊन हे काम सर्व गावकऱ्यांच्या मदतीने यशस्वीपणे पूर्ण केले। याच काळात डॉक्टरांचा प्रत्येक कामातील जोश व जिद्द जवळून पहावयास मिळाली। एकदा प्रवासात बोलता बोलता मी डॉक्टरांना म्हटलं, डॉक्टर मी ५ ते ६ वर्षांपासून रोज (पण अनियमित) सकाळी ४ ते ५ किलोमीटर चालतो पण १०० मीटर जरी धावलो तरी दम लागतो (व अर्थातच या वयात धावणे हे आपलं काम नाही हे मनात पक्के घर करून बसले होते ) डॉक्टर एकच वाक्य बोलले "माझ्याकडे या तुम्ही नक्की धावणार" त्यांचा त्यांच्यावर प्रचंड आत्मविश्वास आहेच पण त्या बोलण्यात त्यांचा माझ्याविषयीचा आत्मविश्वास पण जाणवला..त्यानंतर त्यांचे मॅरेथॉन चे फोटो व रोज धावण्याचे फोटो, विडिओ रेकॉर्ड व टायमिंग पाहत गेलो. हे सर्व पाहण्यात रोजच्या धक्काधक्कीच्या धावपळीत त्यांच्याकडे धावायला जाणे राहूनच गेले. असेच ३ ते ४ महिने कसे निघून गेले कळालेच नाही. मग डॉक्टरांना एक प्रेरणास्थान समजून त्यांनाच डोळ्यासमोर ठेऊन हळूहळू धावण्यास सुरुवात केली । नवरात्रीत प्रत्त्येक वर्षी माझा ९ दिवस उपवास असतो याहीवर्षी तो होता. पहिल्या दिवसापासून धावायला सुरुवात केली . धावत धावता (डॉक्टरांच्या रुपात) आमच्याच सोसायटीतील एक सदस्य श्री अमित बिनीवाले यांनी पाहिले व त्यानी मला त्यांच्याबरोबर धावण्यास सांगितले. उपवास असूनही ९ दिवस रोज सकाळी धावत होतो १०० मीटर धावणारा माणूस १,२,३,४,५,किमी धावू लागला व ९ दिवसात तब्बल ५३ किमी अंतर धावणे पूर्ण केले। खूप आनंद झाला । व धावण्याचा सिलसिला सुरू झाला । ऑक्टोबर १०० किमी, नोव्हेंबर १५० किमी व डिसेंबर ११० किमी (२० डिसेंबर पर्यंत)। डॉक्टरांच्या सांगण्यावरून २ डिसेंबर २०१८ च्या रन फॉर डायवर्सिटी साठी रेजिस्ट्रेशन केले व एक नवी हुरूप जागृत झाली. ४ नोव्हेंबर २०१८ ला डॉक्टरांसोबत १० किमी ट्रेनिंग रन धावत व चालत पूर्ण केले (८० मिनिटे). २५ नोव्हेंबर ला माझ्या होम टाऊन कल्याण मध्ये Imathon 2018 मध्ये आमच्या सोसायटीतील मित्र, मुलगा व मुली सह १० किमी धावलो (७५ मिनिटे) २ डिसेंबर २०१८ ला रन फॉर डायव्हर्सिटी मध्ये डॉक्टर २१ किमी मध्ये पेसर होते व मी १० किमी धावलो (६९ मिनिटे) हा केवळ त्यांच्या सोबत असण्याचा परिणाम।।त्यांच्या चालण्या बोलण्यात आत्मविश्वास' पॉझिटिव्हीटी व ऊर्जा इतकी ठासून भरली आहे की ती ज्याला दिसेल त्याला हे जग खूप सुंदर वाटू लागेल. अर्थातच त्यांच्या भाषेत 🌹Life is beautiful.🌹 🏃🏻♂।।मज्जाच मज्जा।।🏃🏻♂
Majjach majja.....
ReplyDeleteलाइफ ईज ब्यूटीफुल मज्जाच मज्जा
ReplyDelete