जीवन एक अलौकिक अनुभूती
जीवन एक अलौकिक अनुभुती जीवन एक अलौकिक अनुभुती*"जीवन एक अलौकिक अनुभुती* " आज दिनांक *15/02/2022* रोजी औ. प्र. संस्था, अंबरनाथ येथे माननीय *सह संचालक ** *डॉ. नामदेव भोसले साहेब* यांनी दिलेल्या भेटीदरम्यान मानवी जीवनाबाबत प्रकर्षाने जाणवलेले काही *ठळक मुद्दे खालीलप्रमाणे* ..... **आजचा दिवस जीवनाला खऱ्या अर्थाने प्रेरणादायी व सकारात्मकतेने पाहण्याचा ठरला. स्वतःमधील कोणत्याही प्रकारचा 'न्यूनगंड' बाजुला सारुन,मीच निसर्गाची सर्वोत्तम कलाकृती आहे, असे मनावर सतत बिंबवणेआणिआयुष्यात येणार्या प्रत्येक संकटाला धीरोदात्तपणे सामोरे जाणे. सुहास्य वदनाने आयुष्यातील दुःखांना, संकटांना तोंड द्यावे. सतत कृतीशील राहणे. जे काही जीवनात करु ते सर्वोत्कृष्ट करु. गरीबी, दुःख,संकटे यांचा बाउ न करता आपण ज्या व्यवसायात, क्षेत्रात आहोत तिथे अत्युत्तम प्रदर्शन करणे. जशी आपली दृष्टी तशीच असणार सृष्टी, या उक्तीप्रमाणे आपला दृष्टीकोन सकारात्मक ठेवणे. फक्त वर्तमानात जगणे, भुतकाळ तसेच भविष्याचा विचार न करता. स्नेह, संस्कार, स्पर्श, सहवास आणि स्वातंत्र्य या पंचसुत्र...