जीवन एक अलौकिक अनुभूती

जीवन एक अलौकिक अनुभुती
जीवन एक अलौकिक अनुभुती*"जीवन एक अलौकिक अनुभुती* "    आज दिनांक *15/02/2022* रोजी औ. प्र. संस्था, अंबरनाथ येथे माननीय *सह संचालक ** *डॉ. नामदेव भोसले साहेब* यांनी दिलेल्या भेटीदरम्यान मानवी जीवनाबाबत प्रकर्षाने जाणवलेले काही *ठळक मुद्दे खालीलप्रमाणे* ..... **आजचा दिवस जीवनाला खऱ्या अर्थाने प्रेरणादायी व सकारात्मकतेने पाहण्याचा ठरला. स्वतःमधील कोणत्याही प्रकारचा 'न्यूनगंड' बाजुला सारुन,मीच निसर्गाची सर्वोत्तम कलाकृती आहे, असे मनावर सतत बिंबवणेआणिआयुष्यात येणार्‍या प्रत्येक संकटाला धीरोदात्तपणे सामोरे जाणे.     सुहास्य वदनाने आयुष्यातील दुःखांना, संकटांना तोंड द्यावे. सतत कृतीशील राहणे. जे काही जीवनात करु ते सर्वोत्कृष्ट करु. गरीबी, दुःख,संकटे यांचा बाउ न करता आपण ज्या व्यवसायात, क्षेत्रात आहोत तिथे अत्युत्तम प्रदर्शन करणे.     जशी आपली दृष्टी तशीच असणार सृष्टी, या उक्तीप्रमाणे आपला दृष्टीकोन सकारात्मक ठेवणे. फक्त वर्तमानात जगणे, भुतकाळ तसेच भविष्याचा विचार न करता.  स्नेह, संस्कार, स्पर्श, सहवास आणि स्वातंत्र्य या पंचसुत्रीचा आपल्या जीवनात अंतर्भाव असायला हवा.   आपण जिथे  ज्ञानार्जनाचे कार्य करतो ती जागा, परिसर स्वच्छ व सुंदर ठेवणे, व अंगीकारलेल्या कार्यात संपूर्ण झोकुन देणे. संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे. केवळ प्रदर्शन, बडेजाव यांचा बाउ न करता तसेच आपल्या अधिकारवाणीचा संपूर्ण संवादप्रक्रियेत कुठेही वापर न करता,  सहकारी, मार्गदर्शक, मित्र, नातेवाईक यांच्याप्रमाणे मुक्त संवाद साधण्याचे, साहेबांचे कौशल्य खरचं वाखाणण्याजोगेच म्हणावे लागेल.    आपले जन्मदाते आई-वडील  यांना कदापिही अंतर न देता त्यांच्यापश्चात आठवणीत अक्षु ढाळण्यापेक्षा, त्यांना रोज प्रेमाने अलिंगन द्या, त्यांना मिठी मारा आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन जीवनाला सामोरे जा.      या  प्रसंगी मनाला, हृदयाला हात घालत वातावरण भावनिक सुद्धा झाले.     *व्यक्त होणे,* *रिक्त होणे,* *मुक्त होणे* या त्रिसुत्रीचा वापरप्रत्येकाने करून, जीवन फार सुंदर आहे, हे मनावर कोरले पाहिजे व लाभलेल्या मनुष्य जीवनाचे, आपली प्रकृती उत्तम ठेवुन सार्थक केले पाहिजे हा संदेश मिळाला.     *प्रशिक्षणार्थी केंद्रबिंदू* मानुन त्यांना आपले संपूर्ण योगदान देणे व त्याचे पालकत्व स्विकारणे याचा पुनरुच्चार साहेबांनी करुन, कर्तव्यबाबत जागरुक केले.    " लाईफ ईज ब्युटीफूल - मज्जाच मज्जा " हे ब्रीदवाक्य सोबत घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.       *"  I AM THE BEST. "*     *वुई आर ब्युटीफूल -* *मज्जाच मज्जा......*     *आॅल आर ब्युटीफूल - मज्जाच* *मज्जा......*      *फॅमिली ईज ब्युटीफूल -मज्जाच* *मज्जा.....*     *ईन्सटीट्युट ईज ब्युटीफूल **-* *मज्जाच ** *मज्जा** ......**       *अवर ट्रेनिंग ईज ब्युटीफूल *-* *मज्जाच* *मज्जा* ......*       *ट्रेनीज आर ब्युटीफूल - मज्जाच* *मज्जा ......*        *चला तर आपापसातील भिंतींना* *छेद देवु* *या......*      जीवन प्रवासाची एक आदर्श आणि वेगळी वाट दाखवुन,  प्रगती पथावर राहण्यासाठी *दीपस्तंभाप्रमाणे* मार्गदर्शन करणाऱ्या आदरणीय *डॉ. भोसले साहेबांना* त्रिवार धन्यवाद......      पुन्हा एकदा अशाच सकारात्मक विचारांचा परिपाठ घेवुन प्रगतीशील राहण्याचे ,सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने *आश्वस्त* करु या!!!! 👍🏻👍🏻👌🏻👌🏻💐💐🙏🏻🙏🏻बी. बी. संदानशिव, चित्रकला निदेशक, औ. प्र. संस्था, अंबरनाथ.

Comments