नामदेव सर राहूलच्या चष्म्यातून.
*आयुष्य खरंच खुप सुंदर आहे मज्जाच मज्जा*☺️
*नामदेव सर आणि मी*
आतापर्यंत zoom च्या माध्यमातून आपलं दोन सेशन झाले आणि दोन्ही सेशन मध्ये मला बोलायला माझं मत मांडायला पूर्ण संधी मिळाली पण माझ्यापेक्षा खूप सिनियर लोक आहेत त्यामुळे काय बोलावं आपण बोललेलो सर्वांना पटेलच का कदाचित माझ्यात एक वक्ता म्हणून बोलायला किंवा प्रत्यक्ष बोलण्याची जी क्षमता असते ती कमी असावी किंवा आपण ज्याला *प्रेझेंस ऑफ माईंड* म्हणतो ते नसावं त्यामुळं मनात खूप काही असूनही ते बोलता येत नाही पण ते लेखणीतून मांडण्याचा छोटा प्रयत्न
नामदेव सर प्रत्येक वेळी बोलताना एकच वाक्य बोलतात की माझ्याबद्दल बोलू नका स्वतःचं अनुभव सांगा तसं त्यांचं पण बरोबर आहे कारण त्यांचं एकच म्हणणं आहे फक्त एक नामदेव नाही तर त्यांच्यासारखे असे हजारो लाखो नामा तयार झालं पाहिजेत परंतु सांगायचं झालं तर त्यांच्या *जीवन सुंदर आहे मज्जाच मज्जा या महाविद्यालयात* प्रवेश घेतल्यापासून स्वतःहून कोणतीही गोष्ट करायचं म्हटलं तर त्याची सुरवात नामदेव सरांच्या *नामा* पासूनच होते.
माझी आणि सरांची पहिली प्रत्यक्ष ओळख आमच्या गावचे पत्रकार बंधू रुपेश कदम यांनी *माणदेश मॅरेथॉन* मध्ये घडवून आणली अगोदर सरांचं नाव वगैरे ऐकून होतो आणि बऱ्यापैकी मॅरेथॉन च्या जाहिरात मध्ये सरांचा हसरा चेहरा असलेला, दोन हात वर केलेला फोटो पहायला मिळायचा खरं तर मी 2015 पासून आपल्या तालुक्यातल्या *माणदेशी एक्सप्रेस ललिता बाबर* यांची प्रेरणा घेऊन सिव्हिल मधील मॅरेथॉन धावायला सुरवात केली फौज मध्ये क्रॉस कंट्री वगैरे सुरवाती पासूनच धावायचो पण सुटी घेऊन मॅरेथॉन धावायला एक वेगळीच मज्जा येऊ लागली आणि त्यात *नामदेव सरांची ओळख झाली तेव्हापासून तर शरीरातली उर्जा द्विगुणित झाली.*
सरांच्यात काय जादु आहे माहीत नाही कारण त्यांचा फक्त चेहरा जरी पाहिला तरी बरेच काही करण्याची ऊर्जा अंगात संचारते यात काय शंका नाही आणि याचा अनुभव प्रत्येकाला आलाच असावा.
सरांच्या त्या पहिल्या भेटीनंतर नंतर फारसं काय त्यांच्या संपर्कात न्हवतो पण त्यांनतर एखादं मॅरेथॉन धावायचं म्हटलं की त्यावेळी सर नक्कीच आठवायचं रनिंग करून आल्यानंतर डोळे हजारो चेहऱ्यामधे नामदेव सरांनाच शोधायचं आणि कोण्या एका ठिकाणी सरांचा समूह त्यांच्याच धुंदीत डान्स करत असलेला दिसायचा बाकी मेंबर बरोबर ओळख नसतानाही मी सुद्धा त्यांच्या बरोबर नाचत बसायचो त्यानंतर फेब्रुवारी मध्ये पार पडलेली *महाराष्ट्र पोलीस ची मॅरेथॉन आणि दादा ने चालू केलेला माणदेश रनर्स चा w/app गृप* त्या गृपवर दादाने मला ऍड केलं त्यामुळे बऱ्यापैकी सरांच्या संपर्कात यायला लागलो गृपवर त्यांचे रोजचे अपडेट पहायला मिळू लागले सुरवातीला मी जरा अचंबितच झालेलो कारण सरांनी काही जरी पाठवलं किंवा आपण काही पाठवलं तर यात ते फक्त *Life Is Beautiful Majjach Majja* एवढंच लिहायचं मला प्रश्न पडायचा सर असे का लिहतात? याशिवाय दुसरं काहीच का बोलत नाहीत? जवळजवळ दीड महिना हे असेच चालले आणि एकदिवस दादा ने टोकियो वरून zoom मिटिंग अरेंज केली त्यात सर्वांच्या ओळखी झाल्या मी सुद्धा सरांच्या बरोबर मनोसोक्त बोललो मंत्रालयात ड्युटीवर हजर रहायचं होतं तरी सुद्धा ते वेळात वेळ काढून जवळजवळ दीड तास सर्वांशी बोलत होते तेव्हा मला या दोन ओळींचा अर्थच नाही तर त्यामध्ये किती ताकद आहे आणि ते जर आत्मसात केलं तर आयुष्य कसं बदलू शकते हे समजलं.
तेव्हा मला नामदेव मधील *नामा* समजू लागला *(माफी असावी सर एकेरी नावाचा उल्लेख केलाय)* पण मी सर्वांना सांगू इच्छितो नामदेव हे फक्त नाव नाही तर *शरीरात संचारनारा एक ऊर्जास्रोत* आहे जे *शारीरिक दृष्टीने किंवा मानसिक दृष्टीने खचलेले आहेत, जे काही कारणास्तव डिप्रेशन मध्ये गेलेले आहेत* त्यांना मी एवढंच सांगेन की त्यांनी फक्त एकदा नामदेव सरांच्या सानिध्यात यावं खरोखर त्यांना कोणत्याच डॉक्टर ची गरज पडणार नाही तो माणूस आठवड्यातच ठणठणीत होणार हे नक्की कारण *आयुष्य सुंदर आहे मज्जाच मज्जा* या दोन ओळींचा खोलवर विचार केला किंवा ते जर आत्मसात केलं तर बरंच काही घेण्यासारखं, शिकण्यासारखं आहे.
आपण बऱ्याच गोष्टींना, विचारांना विनाकारण पकडून ठेवलेलं असते ज्यामुळं आपल्या मनाला, शरीराला खूप मानसिक त्रास होत असतो अशावेळी या दोन ओळी खूप महत्त्वाच्या ठरतात. थ्री इडीयट पिक्चरच उदाहरण घ्यायचं झालं तर त्यात काही विपरीत होत असेल तर आमिर खान चे तीन शब्द असायचं *All Is Well* तसं ते सुद्धा बरोबरच होतं आता हे झाले *रील मधलं आयुष्य* पण तसेच आपल्या *रिअल आयुष्यात* आपण काहीही करत असलो त्यात पोसिटीव्ह एनर्जी आणायची असेल तर एवढंच लक्षात ठेवायचंय *आयुष्य खुप सुंदर आहे मज्जाच मज्जा* मंग काय सगळीच मज्जाच मज्जा
सर काय करतायत ते कोणतेही काम करतात त्यामध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून देतायत म्हणजे ते स्वतःचे राहतच नाहीत त्या कामाचेच होऊन जातायत मंग व्यायाम असो, रनिंग असो, पाणी फाउंडेशन चे काम असो, सामाजिक कार्य असो, ऑफिस मधील काम असो किंवा एक वक्ता म्हणून बोलण्याचे असो त्यामधुन ते *शिंपल्यातुन मोती किंवा कोळशाच्या खाणीतून हिरा शोधून काढल्यासारखं फक्त आनंद शोधून काढतायत* आणि हाच आदर्श आपल्याला घ्यायचाय.
आमच्या फौज मध्ये आम्हाला बोललं जातं काम कोणतंही असो किंवा रेस्ट च्या दिवशी अचानक आलेली ड्युटी असो करावी तर लागणारच आहे कारण तिथे नाही हा शब्दच नसतो *मंग ते हसत करा किंवा रडत करा पण पार पाडावेच लागते* मंग ते हसत केलेलेच चांगले ना ज्यामुळं शरीरात सकारात्मक ऊर्जा आपोआपच निर्माण होते सरांनी सुद्धा हेच आत्मसात केलंय आळस, किळस हे शब्द त्यांच्या चेहऱ्यावर केव्हाच दिसत नाहीत.
आणि दुसरं म्हणजे या *नामदेवला(सरांना) ओळखायचं असेल तर तो नामदेव(संत नामदेव) माहीत असणं सुद्धा गरजेचं आहे कारण ते जेवढे पांडुरंग भेटीसाठी जिद्दी होते तितकेच हे सुद्धा स्वतःबरोबर बाकी सर्वांचं आयुष्य सुंदर करण्यासाठी जिद्दी💪🏻 आहेत👍🏻
*बाकी माझ्या आयुष्यात खूपच टेंशन वगैरे आहे जगणं मुश्किल झालंय या सर्व अंधश्रद्धा आहेत आयुष्य खरेच खुप सुंदर आहे मज्जाच मज्जा*
*धन्यवाद*
*राहुल हरिभाऊ जगदाळे*🙏🏻
Comments
Post a Comment