बना आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार
*लाइफ ईज ब्यूटीफुल*
*मज्जाच मज्जा......*
ओपन यूनिवर्सिटी ऑफ सेल्फ एक्सप्रेशन च्या छत्राखाली डॉ. नामदेव भोसले यांच्या ध्येयाने, विचाराने व प्रेरणेने प्रेरित होऊन एक नविन उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेऊन एकत्र आलेल्या सर्वाना नम्र विनंती.
आतापर्यंत आपले 5 सेशन पूर्ण झाले आहेत. यामध्ये आपण आपल्या जीवनशैलीचा सखोल अभ्यास व उहापोह केला आहे. सुरुवाती पासूनच आपण कोरोना भय व भिती, श्रवण व संवाद, पालकत्व व ऐकणे या विषयावर आपले अनुभव शेअर करुन व त्यावर प्रतिक्रिया देऊन खूप चांगली सुरुवात केली आहे. परंतु ही सर्व प्रक्रिया आपल्या सर्वांच्या अंगीकारी पडावी व आपले दैनंदिन, कौटुंबिक, व्यवसायिक आयुष्य, शारिरीक व मानसिक आरोग्य, समृध्ही, संसारातील आनंद, स्वयंशिस्तपणा यात सुधारणा व्हावी व सर्वांच्या आयुष्यात नवचैतन्य निर्माण व्हावे हा निस्वार्थी हेतू आहे.
त्यासाठी आपण सर्वानी केवळ मज्जाच मज्जा म्हणून हा हेतू साध्य होणार नाही. त्यासाठी स्वयंशिस्त, प्रामाणिकता, श्रमप्रतिष्ठा, जिद्द, चिकाटी, नियमित व्यायाम, कठोर परिश्रम, विश्वासहर्ता, सेवाभाव यांची जोड द्यायला हवी. प्रत्येक आठवड्यात दिलेला गृहपाठ, त्याची अमलबजावणी, आकलन, उजळणी व नवनवीन गुण आत्मसात करण्याची तयारी हवी.
हे व्यक्त होण्यासाठीचे मुक्त विद्यापीठ आहे. आपण सर्वानी ऐकता ऐकता बोलायला शिकले पाहिजे, स्वताला व्यक्त करायला शिकल पाहिजे. अनुभव शेअर करायला शिकल पाहिजे. स्वताला आनंदी व्हायच असेल व आपल्या आयुष्यात सतेज, उत्साह, नवचैतन्य आणायच असेल तर आपल्याला आपल्या प्रत्येक कृतीचे उर्जेत रुपांतर करायला आले पाहिजे. ही आगळी वेगळी विद्यापीठ निर्मिती त्यासाठीच तयार होत आहे.
सेशनला हजर असलेल्या सर्वानी व्यक्त होण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. आपला वीडियो सदैव चालू ठेऊन आपले अनुभव शेअर करायला हवे. आपल्या प्रत्येकामध्ये काही ना काही कला गुण दडलेला आहे. तो व्यक्त व्हायला हवा. प्रत्येकाकडे एक वेगळी ऊर्जा आहे ती जागृत व्हायला हवी. आपले स्वताचे विचार हेच आपले सौंदर्य आहे. प्रत्येक व्यक्तीत एक नायक दडला आहे तो पुढे यायला हवा. आपल्या प्रत्येकाजवळ जगासमोर व्यक्त होण्यासाठी सुंदर हृदय आहे ते खुले व्हायला हवे. आपण सारे सुंदर आहात म्हणूनच हे विश्व सुंदर आहे. या सर्व प्रकृतीने दिलेल्या अमृताचा स्वाद घ्यायचा असेल व त्याचा थोडासा स्वाद इतराना द्यायचा असेल तर आपल्या स्वताचे आयुष्यातील अनुभव शेअर करा व आपले आयुष्य प्रफ़ुल्लित करा व बना आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार.
लाइफ ईज ब्यूटीफुल 🌹🌹
मज्जाच मज्जा 🕺🕺🏃🏻🏃🏻💃🏻💃🏻🏃🏻♀🏃🏻♀🧎🏻♀️🧎🏻♀️🏋🏻♀️🏋🏻♀️🚴🚴
अरविंद काटकर
ओपन यूनिवर्सिटी ऑफ सेल्फ एक्सप्रेशन, मुंबई.
Comments
Post a Comment