मी व्यक्त होण्याचे मुक्त विद्यापीठ बोलतेय (माझे मनोगत)
मी व्यक्त होण्याचे मुक्त विद्यापीठ बोलतेय. (माझे मनोगत.)
(डॉ. राखी मनियार यांच्याशी संवाद)
काय ग पोरी,
कशी आहेस.
कुठेतरी अडगळीत पडलेल्या मला जिवंत करण्याचा घाट घातलास. नामदेवाच्या मनातील इच्छेला वाचा फोडलीस. तू जेव्हा पासून माझा विचार व निर्मीती करायचा ध्यास घेतलायस, तेव्हापासून तू धावतच आहेस. केवळ माझ्याकडे यायच्या ध्येयाने.
बर झाल नामदेवाला डिवचलस. त्याच्या मनात माझ्या विषयी खूप काही होत. पण त्याला जाग करायला तू परी बनून आलीस. नाहीतर माझ्या सारख्या बेवारस वारयावर सोडून दिलेल्या बयेला कोण विचारत. आजकाल च्या मोबाइल युगात मी कुणालाही नको आहे. सर्वाना मोबाइल ने घेरुन टाकलय. मला तरी आशर्यच वाटतय बघ. मी कित्येक घरात डोकावायचा विचार करते पण मला कुठही जागा मिळत नाही. सगळे जण आपआपल्या कामात बिज़ी असतात.
डोंबल??
कामात कसले मोबाइल मध्ये बिज़ी असतात.
मला नको नकोस झाल होत. खूप आळशी बनले होते. मनात काय काय विचार यायचे बघ. आता माझ कस व्हायच. कुणाला माझ्या साठी वेळच नाही. सगळे इकडून तिकडे उलटे सुलटे सैरभैर नुसते धावतायत. मी बिचारी तोंडावर पांघरुण घेऊन पडले होते.
मध्ये मध्ये नामदेव यायचा. माझ्या साठी धडपडायचा. लय काय काय करायचा. त्याच्या डोक्यात लय काय बाय विचारानी घर केल होत. नुसता धावत होता सैरावैरा. पण माझी आठवण झाली की यायचा मला भेटायला. मला लय बर वाटायच बघ. तसा तो इथ माझ्याकडे आल्या पासून सारखा माझाच विचार करत असतो. मला कस घडवायच. माझी देखभाल कशी करायची. मला एवढी जागा पुरेल का. जगातील वेगवेगळी माणस माझ्याकडे फिरकली तर मी कशी दिसेन. कशी असेल. लयग त्याच्या डोक्यात सारख काय बाय चालू असत. मी नुसती त्याच्या कडे बघतच असते. काय कराव सुचतच नाही. पण हे म्या पक्क ओळखल होत, की त्याने माझा ध्यास घेतलाय. आता तो गप्प बसणार नाही. त्याला माझी लय काळजी.
त्यान माझी सेवा व उठाठेव करायला दोन दोन कुटुंब आणून ठेवलीत इथे. तो मुंबई ला असतो ना. मुंबईतली धावपळ, कामाची दगदग, त्यात त्याची सरकारी नोकरी. मोठा अधिकारी हाय माझा नामदेव. तो ईथ आला की मला भरुन येत. मग मी दिलखुलास त्याच्यात डोकावते. मग तो मज्जाच मज्जा म्हणतो. मला लय बर वाटत.
आता मार्च मध्ये तो काय करोना का बिरोना आला होता ना मुंबईत तेव्हा नामदेव माझ्याकडे पोरा बाळासह रहायला आला होता. त्याची बायको मुक्ता लय हुशार हाय बघ. माझ्यावर लय जीव हाय तिचा. इथ आली की जायच नावच काढत नाही. तिच नुसत इथ असण माझ्यासाठी कस सण असल्यासारख असत. सारखी हसतच असते ती पण माझ सगळ बघते ती. लय काळजी घेते माझी. तिच्या इथे येण्यान लय फरक पडला बघ.
त्यांची दोन पोर लय ग्वाड हायत बघ. छोटा बाबू सार्थ व मोठी सोनकळी मिनल. फॉरेनला असते ती. त्या दोघांचा आरसाच हायत त्यांची दोन्ही पोर. चौघ महिनाबर माझ्या कडे होती. त्यांच काय ते गाण लाइफ ईज ब्यूटीफुल मज्जाच मज्जा सारख गुणगुणायची. कानाला लय बर वाटत बघ. मला बी आवडत ते.
नामदेवान माझी सेवा करायला एक इंजीनियरच ठेवलाय बघ. सारखी माझी मोजमाप घेत असतो. इथ हे कर तिथ ते कर सारख काय काय करत असतो तो. मला बया कायबी कळत नाही त्यातल. मी नुसत तोंड आ वासून त्याच्या कडे बघत असते. म्हणतो कसा तुला रुप द्यायच हाय ग आई. प्रफुल नाव हाय त्याच.
अग राखी काय सांगू तुला, ती जोडी संभाजी व मनिषा आपल घरदार सोडून इथ आल्यातीय माझी सेवा करायला. आपल्या पोरा बाळा सकट. नामदेवाचा त्यांच्या वर लय जीव हाय बघ. थोड बी विसरत नाही त्याना. सारख कमी जास्त चौकशी विचारपूस करत असतो त्यांची. ती दोघ बी हायतच तशी. लय कष्ट उपसलेत आजवर त्यानी. लय प्रेमळ हायती. माझी सगळी सरबर करतात दिवस रात्र.
असू दे. मी बोलायला लागले की मला थांबावस वाटतच नाही. लय तोंड भरुन बोलाव आपल्या माणसावर जीव लावावा. मनातल सगळ सांगितल की कस मन हलक हलक होत बघ. नामदेव कायम म्हणतो. मनातल बोलायच, मुक्त व्हायच आणि रिक्त व्हायच. तुला माझ अस येरगबाळ, वेडवाकड रूप बघायला आवडत नाही का ग. एक ठिणगी टाकलीस, चिंगारी पेटवलीस आणि शेकडो लोकाना जमा केलस. तुझ्यात पण जादू हाय बघ नामदेवा सारखीच. म्हणूनच तुला माझ्या विषयी कळवळ वाटली आणि सुरु झालीस कधीच न थांबण्यासाठी. तुझ्यातला, अल्लडपणा, खट्याळपणा, खळखळणार हसू मला डोळे भरुन बघायच हाय बघ. नुसतच माझ्या विषयी बोलतेयस. मला भेटायला कधी येणार तुमच्या लाइफ इज ब्यूटीफुल मज्जाच मज्जा च्या मंडळीना घेऊन.
असू दे. माझी वेडी माया हाय म्हणून म्हणते. पण तू तुझी काळजी घे. त्या करोना की बरोना ने हैदोस घातलाय म्हणत्यात सगळीकडे. तुझ्या सवडीन ये पण ये.
मी वाट पाहीन.
तुझीच
ओपन यूनिवर्सिटी ऑफ सेल्फ एक्सप्रेशन..
(व्यक्त होण्याच मुक्त विद्यापीठ)
Comments
Post a Comment