कोरोना भय आणि कृती
LIFE IS BEAUTIFUL 🌹🌹
MAJJACH MAJJA🏃🏻♂🏃🏻♀🚴
शुक्रवार दि. 12 जून 2020
*Lifeisbeautifulmajjachmajja*
ZOOM सेशन 2
*कोरोना भय आणि कृती*
डॉ नामदेव भोसले यांच्या स्वभावाने व कर्तृत्वाने प्रेरित होऊन आयुष्यात काहीतरी वेगळे करण्याची धमक असलेल्या तरुणाईची ही दुसरी सार्वजनिक ऑनलाइन बैठक. कोरोना भय व कृती या विषयावार सर्वांचे मत जाणून घेणे व त्यावर ऊपाय शोधून कसे निर्धास्तपणे व सामान्यपणे मार्गक्रमण करता येईल एवढा माफक उद्देश डोळ्यासमोर ठेऊन या बैठकीचे आयोजन होते. सध्या कोरोनाने जसा जगभर धूडघूस घातला आहे, त्यावर ऊपाय शोधणे व त्याचे भय लोकांच्या मनातून काढून टाकणे हा मूळ उद्देश व आजच्या बैठकीचा अजेंडा होता.
बैठकीच्या सुरुवातीलाच डॉ. राखी मनियार व Lifeisbeautifulmajjachmajja टीम ने बनवलेली एक ध्वनी चित्रफित दाखवण्यात आली. त्यात कोरोना पासून दूर राहण्याचे सर्व ऊपाय अंतर्भूत होते. ध्वनी चित्रफित खूपच सुंदर व मार्मिक होती. जे शब्दातून कळत नाही ते कृतीतून लगेच कळते याच हे उत्तम उदाहरण.
डॉ नामदेव भोसले यांच्या बैकग्राउंड स्क्रीन वर असलेल Life is beautiful majjach majja बॅनर खूप खुलून दिसत होत व सर्वांचे लक्ष वेधून घेत होत.
Zoom वर हजर मान्यवरानी आपापले कोरोना विषयीचे भय व विचार बोलून दाखवले. तसेच मागील सेशननंतर चा आठवड्या बरातला प्रवास ही सर्वानी खूप सहजपणे वर्णन केला. रोज व्यायाम करणारे, योगा करणारे, रनिंग करणारे, जॉग्गिंग करणारे, सायकलिंग करणारे, ऑफ़िस ला नियमित जाणारे चेहरे सर्वासमोर बोलायची वेळ आली की गप्प बसतात, ओशाळतात अशा सर्वाना डॉक्टर बोलत करणार नाहीत तर नवलच. अशा सर्वाना डॉक्टरांनी बोलत केल व सुरु झाला एक मज्जाच मज्जा चा सळसळता झंझावात. सर्वांचे कोरोना विषयी चे भय व मनोगत ऐकून डॉक्टरांनी आपल्या शैलीत बोलायला सुरुवात केली व सुरुवातीलाच मरण अर्थात मृत्यू ला सामोर कसे जायच यावर आपल बिनधास्त परखड मत मांडून प्रकाश टाकला. प्रत्येक जण आपल्या बोलण्यातून भीती व्यक्त करत होत पण भय म्हणजे काय तर मरण हे बोलायला घाबरत होत. म्हणून डॉक्टरांनी स्वता त्याची व्याख्या सर्वाना सोप्या शब्दात सांगितली. हा देह नश्वर आहे. तो मन आणि मेंदू या दोहों च्या नियंत्रणाखाली काम करतो. जेव्हा आपण मनाने खूप हळवे होतो व मेंदूने जास्त विचार करतो तेव्हा कळत नकळत आपण मृत्यू ला घाबरतो. ही आपली भिती आहे. आपण फक्त कर्म करत राहिलो, दिलखुलास जे चांगल आहे ते निस्वार्थी पणे करत राहिलो. तर कसलेही भय नाही. कोरोनाची भीती मनातून काढून त्यासाठी ज्या आवश्यक सायंटिफीक बाबी आहेत त्याचे काटेकोरपणे पालन करणे इतक साध सरळसोप गणित आपल्या हातात असताना आपण भरकटत जातो व मरणाचा विचार मनात आणतो. जे कधी ना कधी होणारी न चुकणारी बाब आहे पण आपण त्यास उगीचच कवटाळून ठेवतो व जीवनाचा आनंद घ्यायचा विसरतो. हे आयुष्य खूप सुंदर आहे. त्याचा आपण मनसोक्त आनंद लुटला पाहिजे. असे डॉक्टरांनी त्यांच्या शैलीत सर्वाना पटवून दिले.
श्री संजय इंगळे साहेबानी खूप चांगल्या शब्दात कोरोनास न घाबरण्या विषयीचे आपले मनोगत व्यक्त केले तसेच आपली सकारात्मक मनोवृती यातून बाहेर पडण्यासाठी कशी कारणीभूत ठरू शकते त्याविषयी परखड मत मांडले.
डॉ. राखी मनियार यानी या कार्यक्रमाचे खूप सुंदर सूत्र संचालन केले.
श्री.अशोक पटाडे व श्री. दादा सुर्यवंशी यानी सर्व समतोल राखत तांत्रिक बाबींचे सुरेख नियोजन केले.
तसेच डॉ मन्नू, अजितदादा पवार, बिपीन जगताप, निकम साहेब, SM साहेब, रुपाली सावंत, अमोल शेवाळे, मनस्वी गोंधळी, दादा सुर्यवंशी, राहूल जगदाळे, श्री व सौ. लक्ष्मण वाघमारे यानी आपले दिलखुलास मनोगत व्यक्त केले.
या Life is beautiful majjach majja ZOOM2 बैठकीस जवळ जवळ 80 जण हजर होते. रोज सकाळी लवकर उठण्याच्या व आपली दिवसाची सुरुवात नयनरम्य पहाटे पासून करण्याच्या सर्वांच्या आश्वासनानंतर या बैठकीची सांगता झाली. येणारा प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी नविन संधी घेऊन येणारा ठरेल व आपल आयुष्य कस सुंदर करता येईल याचेच ध्येय डोळ्यासमोर ठेऊन Life is beautiful majjach majja ZOOM3 साठी शनिवार दि. 20जून रोजी पुन्हा एकदा एक नविन विषय घेऊन ही मज्जाच मज्जा भेट ठरली.
हे आयुष्य सुंदर आहे ..🌹🌹
मज्जाच मज्जा 🏃🏻♂🏃🏻♀🚴
एन्जॉय दिल से ❤❤
Comments
Post a Comment