आयुष्यावर बोलू काही.

*लाइफ ईज ब्यूटीफुल मज्जाच मज्जा* 

*स्वतः व्यक्त होण्यासाठीचे मुक्त विद्यापीठ*
*(यूनिवर्सिटी ऑफ सेल्फ एक्सप्रेशन)*
डॉ नामदेव भोसले यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या गोड, हसतमुख, शिस्तबद्ध व ध्येयवेड्या स्वभावाने व कर्तृत्वाने प्रेरित होऊन आयुष्यात कलात्मक, प्रापंचिक, सकारात्मक, वैचारीक, सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी, नियतीने दिलेल्या या सुंदर मानवरुपी जीवनाचे सोने करणेसाठी व इंजिनरुपी मानवी शरिरात नवचैतन्य निर्माण करणेसाठी  एकत्र आलेल्या सर्व वयोगटातील वयाने व मनाने तरुण असलेल्या तरुणाईने निर्माण केलेल एक आगळ वेगळ मुक्त विद्यापीठ.

*आयुष्यावर बोलू काही.*
प्रत्येक व्यक्ती जस आयुष्य समोर येईल तसे आपापले आयुष्य जगत असते. त्यात आपापल्या संस्कृती, संस्कार, परंपरा, कौटुंबिक आचरण, भाऊबंद, मित्र, आजूबाजूचा परिसर हे त्याची जडण घडण घडण्यास कारणीभूत ठरतात. हे करत असताना  पैसा, संपती, पद, प्रतिष्ठा, मानपान, मोह, विकास यात गुरफटुन जातो. व खर आयुष्य जगणे विसरुन जातो. आणि केवळ नात्यांची व संपतीची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करता करता स्वतः च्या आयुष्यावर बोलणे वा स्वतःला व्यक्त करणेच राहून जाते.  

*जीवन एक उत्सव*
हे आयुष्य एक उत्सव आहे. तो साजरा करायचा असेल तर स्वतःचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे. व सर्वांगीण विकास करायचा असेल तर जीवन शिस्तबध्द पण मजेत जगता आल पाहिजे. यासाठी आपणास साथ हवी असेल तर या आपण सारे मिळून हा उत्सव साजरा करु या. स्वतः व्यक्त होण्यासाठीचे मुक्त विद्यापीठ च्या माध्यमातून. 

आपला येणारा प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी नविन संधी घेऊन येणारा ठरेल व आपल आयुष्य कस सुंदर करता येईल हेच ध्येय व उद्दिष्ट  डोळ्यासमोर ठेऊन येत आहोत एका नविन आगळ्या  वेगळ्या  विद्यापीठाच्या रुपाने.
यूनिवर्सिटी ऑफ सेल्फ एक्सप्रेशन.

लाइफ ईज ब्यूटीफुल मज्जाच मज्जा

🏃🏻🏃🏻🏃🏻‍♀🏃🏻‍♀🧎🏻‍♀️🧎🏻‍♀️🚴🚴🏋🏻‍♀️🏋🏻‍♀️🙏🙏
अरविंद काटकर.

Comments