पोपट ऊर्फ पोपट्या भाग 2

चित्रपट: पोपट (भाग 2)

माझ्या गावी प्रथम श्रेणीत दहावी ऊतीर्ण झालो व पुढील शिक्षणासाठी काय करायच या विवंचनेत होतो. माझे काही सीनियर मित्र श्री दादासो सुर्यवंशी, भीमराव देशमुख व भरत कारंडे हे कराड येथे सायन्स कॉलेज ला शिकत होते. त्यांच्यामुळे कराड ला सायन्स कॉलेज ला प्रवेश घेतला. घरची परिस्थिती बेताचीच असलेने माझे काका म्हणजे आबा यानी माझ्या शिक्षणाची जबाबदारी घेतल्याने तो प्रश्न सुटला होता. कॉलेज सुरू झाले. अकरावी ला पहिले सहा महिने असेच सेट होण्यात गेले. मला गणिताची जास्तच गोडी असल्याने व बारावी ला गणित सोडले तरी चालते हे समजल्याने मी खुष होऊन त्याचा अभ्यासच केला नाही. परिणाम अकरावी ला 60% मार्क मिळूनही माझा रिजल्ट राखून ठेवला गेला कारण गणित फक्त 10मार्क्स. सर्व पास झाले. मी एकटाच हताश. त्याचवेळी मी SGM कॉलेज मध्ये उन्हाळी क्लास म्हणजे vacation मेडिकल बैच मधे होतो. मेडिकल साठी अभ्यास करणारा मुलगा अकरावी नापास. कुणाला काय तोंड दाखवणार पण तेव्हा मी थोडा उचापतीखोर, धडपडड्या होतो. डॉक्टर व्हायच्या ध्येयान पछाडलेला. माझा रिजल्ट राखून ठेवला असल्याने मला सरानी वाइस प्रिंसिपल ढवळे सराना भेटायला सांगितले. मी लगेच त्यांचा अर्धा लाकडी गेट खोलून आत घुसलो. त्यानी मला पाहताच रिजल्ट च ledger उघडून पाहिले व सांगितले दाखला घेवून जा व आर्ट्स किंवा कॉमर्स ला प्रवेश घे. तुला गणित काहीच येत नसेल तर सायन्सला प्रवेश मिळणार नाही व म्हटले 25 वर 10मार्क ग्रेस मिळू शकतात 10 वर 25 नाही. जा निघ बाहेरुन फॉर्म भरुन दे दाखला देतो. डॉक्टर व्हायची स्वप्ने पाहणारा मी तिथेच स्तब्ध उभा होतो अगदी हताश होऊन ओशाळवाण्या नजरेने पण पास केल्याशिवाय बाहेर जायच नाही हे ठरवूनच. मी त्याना सांगितले सर मी गणित सोडून Geology घेतो पण मला पास करा. व बारावी सायन्स ला प्रवेश द्या. तेव्हा ते मला म्हटले तुझ्या आई वडीलाना घेऊन ये. मी म्हटले सर ते लांब गावी आहेत त्यामूळे येऊ शकणार नाहीत व त्याना हे कळल्यावर ते खूप नाराज होतील. मग म्हटले कोणी ओळखीचे असेल तर घेऊन ये. मी लगेच उडी मारुनच केबिन बाहेर आलो. माझे सीनियर मित्र दादासो सुर्यवंशी याना घडलेला प्रकार सांगितला. ते सराना चांगले ओळखत असल्याने माझ्या बरोबर यायला तयार झाले. आम्ही आत शिरताच त्यानी तू याची हमी घेणार का विचारताच त्यानी लगेच हो म्हटले. व मला सांगितले, की खूप अभ्यास करुन बारावीला फ़र्स्ट क्लास मिळवून दाखविन अन्यथा कॉलेजला तोंड दाखवणार नाही. असे लिहून दे. मी क्षणाचाही विलंब न लावता लिहून दिले व promoted असे मार्क्स शीट घेऊनच केबिन बाहेर पडलो. बारावीला गणित सोडून प्रवेश मिळाला व मी सुटकेचा निश्वास सोडला. आता आपल्याला डॉक्टर होण्यास कोणी ही रोखू शकत नाही.

बारावीला भरपूर अभ्यास केला. इतका की गंभीर चे physics व Concepts of Biology पूर्ण पाठ होते. केमेस्ट्री सर्व reaction जवळ जवळ घोकल्या होत्या. HSC परिक्षा सुरु झाली व पहिला पेपर होता English चा. 
पहिल्या दिवशीच ताप भरला. डोळ्या समोर काजवे चमकू लागले. कसाबसा पेपर लिहला व दुपारी मित्र डॉक्टर कडे घेऊन गेले. औषध घेतल पण एकच लक्ष होत पेपर व्यवस्थित द्यायचे. फिजीक्स सुध्हा तापातच गेला. बरीच होस्टेल ची मुले drop घ्यायच्या मनस्थितीत होती. माझेही मन डळमळले पण परिस्थिती, आई वडिल, आबा व ढवळे सर यांचा चेहरा डोळ्यासमोर यायचा. संपूर्ण परिक्षा दिली व डॉक्टरीच्या स्वप्नाला गालबोट लागणार असे वाटू लागल.

बारावी फ़र्स्ट क्लास मध्ये पास झालो.  ग्रुपला मेडिकल चा स्कोर झाला नाही म्हणून निराश झालो. पण पुन्हा बीएससी Agri ला जाऊन मामा सारखे शेती ऑफिसर व्हायच व MPSC चा अभ्यास करायचा हे स्वप्न ठरवल. त्यातही सात बारा चा ओरिजिनल उतारा न जोडल्याने अर्ज बाद झाला. ही वाईट बातमी आली व सर्व स्वप्ने चूर व्हावीत तसे झाले. Fisheries Science साठी रत्नागिरीस गेलो तेथेही यश आले नाही. पुन्हा बीएससी होण्यासाठी कराडला प्रवेश घेतला तेही नाईलाजाने. 1986ला बीएससी केमिस्ट्री झालो. शिवाजी विद्यापिठात कोल्हापूरला एमएससी साठी प्रवेश मिळाला होता. दीड महिने कॉलेज केल्यावर मुंबईहून VJTI ला केमिकल टेक्नोलॉजी इन फूड ड्रग्स व कोस्मेटीक्स साठी प्रवेश मिळाला. एमएससी अर्ध्यावर सोडूनच मुंबईला आलो. केमिकल टेक 1988ला पूर्ण झालो. Duphar Interfran ला Inplant ट्रेनिंग घेऊन  31st मे ला कॉलेज पूर्ण झाले व Chemo test laboratory त 3जून ला पहिल्या नोकरीसाठी रुजू झालो. तीनच दिवस काम केले व लगेच Khandelwal laboratory ठाणे येथे इंटरव्यू झाला. 20जून ला तिथे रुजू झालो. (दरमहा रुपये 1000फक्त.) फक्त तीनच महिने.

आधी मुंबई खुणवायची म्हणून कॉलेज साठी मुंबईत आलो व नंतर गावची खूप ओढ म्हणून Magnachem Pharmaceutical ला सातारा गाठले. केवळ एकच दिवस सुट्टी व त्या दिवशी सुध्हा कधी कधी जावे लागे त्यामुळे फक्त काम व काम असेच झाले त्यामुळे आयुष्य कस मजेत जगता आल पाहिजे म्हणून 2 वर्षातच मुंबई गाठली. 1990च्या मे पर्यंत कसेबसे सातारा सोसले. कामाचा छान अनुभव मिळाला. परत आपली मुंबईच बरी म्हणून मुंबईस आलो. 28 मे 1990 ला Alkem जॉईन केली. केवळ महिना दोन महिने राहून नविन चांगला multinational कंपनी त जॉब शोधायचा हे ऊद्दिश्ट डोळ्या समोर ठेवूनच. पण नियतीला काही वेगळच मान्य होत. मी आजतागायत तिथेच आहे. एक महिन्यासाठी मुंबईत प्रवेश मिळवण्याच्या हेतूने जिथे गेलो तिथेच आयुष्यभर काम करेन अस स्वप्नात ही वाटल नव्हत.

Comments