व्यक्त होण्याचे मुक्त विद्यापीठ निर्मिती चा एक मार्ग
*व्यक्त होण्याचे मुक्त विद्यापीठ* निर्मिती चा एक मार्ग म्हणून
*लाइफ इज ब्यूटीफुल मज्जाच मज्जा टीम*
तर्फे आजवर 10 सेशन पार पडली.
डॉ नामदेव भोसले यांचे अफाट ज्ञान, त्यांची स्वता आत्मसात केलेली एक स्वयंपूर्ण स्वावलंबी जीवनशैली, स्वताला प्रत्येक कामात झोकून द्यायची सचोटी, प्रत्येक माणसाकडे सकारात्मकपणे बघण्याचा दृष्टीकोन, प्रत्येक विषयाचा अगाध अभ्यास, भाषेवरील पकड, वक्तृत्व कौशल्य, वैचारिक व प्रेमळ दृष्टीकोन, इतराना सांगायच्या आधी स्वतः आचरणात आणलेली जीवन पध्हती, ऊर्जा, प्रशासनातील अनुभव, माणस पारखण्याची कला, समाजासाठी झटण्याची उमेद, प्रामाणिकपणा, सेवाभाव, साधेपणा व सहजता यातून निर्माण होणारी स्पेस आपण सर्वानी या 10 आठवड्याच्या प्रत्येक सेशन मध्ये अनुभवली व आपण आपल्यातला अडगळीत खितपत पडलेला माणूस जागा केला.
प्रत्येक सेशन मध्ये आपल्या आयुष्यातील वेगवेगळ्या विषयाना हात घालून त्याचा स्वताच्या खास शैलीत उहापोह केला व आपल्या समोर विस्तृत मांडणी केली. प्रत्येक विषयाचे सामर्थ्य ओळखून त्याची अचूक मांडणी केली. सर्वांचे आपले स्वताचे अनुभव कथन घेऊन त्यावर आलेल्या अनुभवातून आयुष्य सुंदर करण्याचे नवनवीन मार्ग शोधले. आपले कुटुंब व नातेसंबंध यात तांत्रिक युगाने निर्माण केलेली पोकळी सहजपणे भरुन काढण्यासाठी व्यक्त होण्याचा सुलभ मार्ग दाखवला. सेशन ला हजर असणारर्या सर्वांच्या आयुष्यात सकारात्माक्ता, ऊर्जा व आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार, जशी दृष्टी तशी सृष्टी, व्यक्त व्हा मुक्त व्हा व रिक्त व्हा ही ब्रिदे आपल्याच अनुभव कथनातून प्रत्येकाच्या मनावर खोलवर रुजवली.
नात्यातील मालकी हक्क सोडून नातेसंबंध अधिक घट्ट व दृढ करण्यावर भर दिला. प्रत्येकाला आपले आयुष्य मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. ते बंध मोकळे करण्याचा प्रयत्न केला. कळी बंद घरात नाही तर निसर्गाच्या सान्निध्यात उमलते हे दाखवून दिले. प्रत्येकाकडे काही ना काही कौशल्य असते ते कळाले की जीवन एक उत्सव बनून जाते. मग ते जिवंतपणीच अनुभवायला शिकले पाहिजे हे ठामपणे सांगितले.
लाइफ ईज ब्यूटीफुल मज्जाच मज्जा कोअर टीम ची निर्मिती करुन व्यक्त होण्याचे मुक्त विद्यापीठ निर्मितीचा मार्ग सुकर केला. प्रत्येक कोअर टीम सदस्याला विद्यापीठाची दृष्टी, ध्येय, धोरणे, उद्दीष्टे व मूल्ये याबाबत सजग केले. त्यांना शिस्त, विचारसरणी, परखडपणा, स्वताशी प्रामाणिकता, श्रमप्रतिष्ठा, सेवाभाव व समाजकार्य हे गुण अवगत करण्यासाठी खुप कठोर परिश्रम घेऊन कधी प्रेमाने तर कधी कडक शिस्ती चे धडे देऊन विद्यापीठ निर्मितीसाठी तयार केले.
श्री संजय इंगळे साहेबांनी त्यांच्या सोज्वळ, निर्मळ स्वभावातील व बोलण्यातील मधुर गोड वाणीने श्रवण व संवाद या विषयावर सर्वाना मंत्रमुग्ध केले. संवाद व श्रवण अर्थात ऐकण्या विषयी प्रचंड व गाढा अभ्यास असणार्या संजय सरानी ज्या ज्या गोष्टी विस्तृतपणे सांगितल्या त्या प्रत्येकाने आपल्या रोजच्या आयुष्यात वापरायला सुरुवात केली व तशी जीवनशैली अवगत केली तर त्याच्या आयुष्यात कधीही अडचण वा अडसर येणार नाही. विद्यापीठ निर्मीतीचा मार्ग या सेशन मध्ये बोलताना त्यानी सर्वाना दोन बाबी खूप सुंदर रित्या सांगितल्या त्या म्हणजे,
1) जोपर्यंत माझी दृष्टी बदलत नाही तोपर्यंत मला जग सुंदर दिसणार नाही.
2) ईकागिया (Reason for being) माणसाला आपला ईकागिया सापडला की त्याचे जीवन सुंदर होते.
व्यक्त होण्याचे मुक्त विद्यापीठ निर्मिती साठी डॉ नामदेव भोसले यांच्या परिस स्पर्शाने निवडलेला कोअर टीममधील प्रत्येक सदस्य असा आहे की त्याच्याकडे काहीतरी वेगळ आहे. प्रत्येक जण ध्येयवेडा आहे. अपार कष्ट करण्याची क्षमता आहे. आपल आयुष्य जगता जगता आपण समाजाचे काही तरी देणे लागतो. ही भावना त्याच्यात दृढ आहे. सर्वांचे मन व विचार खूप सुंदर आहेत. आउट ऑफ बॉक्स जाऊन काहीतरी वेगळ करण्याची धडपड असणारी व अपार मेहनत घ्यायची ऊर्मी असणारी ही मंडळी आपली स्वताची ओळख बनवण्यात नक्कीच यशस्वी होतील. यात यत्किंचितही शंका नाही.
कौतुकास पात्र कोअर टीम मधील सदस्य :
सौ. राखी मनियार
सौ. मुक्ता भोसले
सौ. अस्मिता कालन
सौ. रुपाली सामंत
कु. मनस्वी गोंधळी
कु. जयश्री पाताडे
डॉ. नामदेव भोसले
श्री. संजय इंगळे
श्री. अशोक पाताडे
श्री. रूपेंद्र मोरे
श्री. किशोर खाचणे
श्री. समीर भाटकर
श्री. बिपीन जगताप
श्री. महेश राणे.
श्री. बाळासाहेब झंजे
श्री. लक्ष्मण वाघमारे
श्री. दादा सुर्यवंशी
श्री. गौरव पाताडे
श्री. प्रफुल सुतार आणि
श्री. अरविंद काटकर
हे आयुष्य सुंदर आहे .. 🌹🌹
आपण सारे मिळून आणखी सुंदर बनवू या.🌹🌹🌹🌹
लाइफ ईज ब्यूटीफुल 🌹🌹
मज्जाच मज्जा...🕺🏻🕺🏻💃🏻💃🏻
एन्जॉय दिल से ❤❤
धन्यवाद..
आपलाच
अरविंद काटकर
ओपन यूनिवर्सिटी ऑफ सेल्फ एक्सप्रेशन
मुंबई.
Comments
Post a Comment