गुरु पोर्णिमा विशेष

*गुरु पोर्णिमा विशेष* 

*कल्याण रुनर्स चे तीन भक्कम आधारस्तंभ.*

सध्या सर्वत्र कोरोना ने थैमान घातलय तरी आमच्या दिवसाची सुरुवात सकाळी न चुकता समीर सर आणि टीम च्या कोर ट्रेनिंग व स्ट्रेचिंग च्या झूम मीटिंग ने होते. सकाळी 6 वाजले की आमच्या कल्याण रुनर्स चे सर्व सदस्य मॉर्निंग फिटनेस साठी ऑनलाइन सज्ज असतात. रोहित सरांच्या वार्मअप ने सकाळ सुरु होते व हळूच समीर सर जगदीश सरांना एजिलिटी ट्रेनिंग साठी पाचारण करतात. बॉडी वार्मअप व सर्व एक्झरसाईज करुन सर्वांच्या अंगात एक वेगळीच ऊर्जा व लवचिकता तयार होते व शरिरात नवचैतन्य संचारल्या प्रमाणे सर्व जण एका लयबद्ध मोसम मध्ये येताच समीर सरांची एंट्री होते. व सुरू होतो मस्त कोअर ट्रेनिंग चा सिल्सिला. प्रत्येक आठवड्यातील  मंगळवार, गुरुवार व शनिवार समीर सरांचा ऑनलाइन ट्रेनिंग सेशन असतो. या एक्झरसाईज सेशन चा एवढा फायदा झालाय की बुधवार, शुक्रवार व रविवार रनिंग करताना कुठेही दम लागत नाही किंवा आपण रनिंग साठी सज्ज नाही असे वाटत नाही. फक्त धावत रहायच एवढच शिल्लक असत कारण समीर सरानी तीन दिवस करायला लावलेला एक्झरसाईज एवढा मजबूत असतो की बॉडीची फ्लेक्ज़ीबीलिटी, लय, व फिटनेस पूर्ण तयार झालेला असतो.

समीर सर, रोहित सर व जगदीश सर तुम्ही तर आमच आयुष्यच बदलून टाकलय. आमच्यातला आत्मविश्वास द्विगुणीत केलाय. त्यामुळे तुम्ही दिलेल टारगेट कधीच अशक्य वाटत नाही. म्हणूनच मी आज बाहेर लॉकडाउन आहे व खूप पाऊस पडतोय म्हणून घरी न थांबता सरळ आमच्या कॉमप्लेक्स मध्येच धावायला सुरुवात केली व तुम्ही दिलेल 25 किमी च टारगेट पूर्ण केल तेही सोशल डिस्टनसिंग चे सर्व नियम पाळून. 

धन्यवाद समीर सर, रोहित सर व जगदीश सर.💐💐💐
हे आयुष्य सुंदर आहेच. 🌹🌹🌹
पण तुम्ही आमच्या आयुष्यात येऊन ते अधिक सुंदर केलत. 🌹🌹🌹🌹🌹🌹
मज्जाच मज्जा...🕺🕺

आज गुरूपौर्णिमे निमित तुम्हा सर्व वंदनीय गुरुना खूप खूप शुभेच्छा.💐💐💐🙏🙏🙏🏃🏻🏃🏻🏃🏻

Comments